बँकेत नोकरी कशी मिळवावी? / How to get a job in a bank in marathi ?
भारतातील 85% पेक्षा जास्त नोकरीच्या संधी संदर्भांद्वारे ( By references) भरल्या जातात आणि या रेफरन्समुळे, अनेक पात्र उमेदवार जे ज्ञानी, कुशल आणि दृढनिश्चयी आहेत त्यांना बँकांमध्ये नोकरी मिळत नाही. जर तुम्हालाही तुमचे करिअर बँकिंग क्षेत्रात सुरू करायचे असेल, पण तुमच्याकडे कोणाचाही रेफरन्स नसल्यामुळे संघर्ष करत असाल, तर तुमची समस्या आज 100% दूर होणार आहे. या पोस्टमध्ये, मी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन रेफरन्स कसे तयार करू शकता यावरील सर्वोत्तम आठ मार्गाविषयी माहिती देणार आहोत.
मोठ्या शहरांतील आणि टियर वन टाउनमधील लोकांना रेफरन्स मिळवणे खूप सोपे आहे, परंतु या पोस्टमध्ये आम्ही केवळ मोठ्या शहरांतील लोकांनाच नव्हे तर लहान गावांतील लोकांनाही जॉबसाठी रेफरन्स मिळविण्यात मदत व्हावी म्हणून लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ही पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे नीट वाचा.
1) लोकल बँक ब्रांचला भेट द्या.
- पहिला मार्ग म्हणजे स्थानिक बँक शाखांमध्ये जाऊन भेट देणे. मित्रांनो, तुमच्या गावात आणि शहराजवळ बँकांच्या अनेक शाखा असतील, त्या शाखांमध्ये जा आणि तेथील बँक कर्मचाऱ्यांसोबत संबंध बनवा.
- पहिल्या भेटीत जाताच जॉबबद्दल बोलू नका. पहिल्यांदा तुम्ही ग्राहक म्हणून जा, त्याच्याकडून काही बँकिंग उत्पादनांबद्दल समजून घ्या, पेमेंट जमा करण्यासाठी जा, पेमेंट काढण्यासाठी जा, थोडे नाते निर्माण करा, वारंवार भेट द्या जेणेकरून ते कर्मचारी तुम्हाला ओळखू लागतील.
- त्यानंतर काही दिवसांनी ते तुम्हाला ओळखू लागतील तेव्हा तुम्ही रेफरन्ससाठी विनंती करू शकता. तुम्हाला बँकेतील सीनियर अधिकारी संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला ते चांगली मदत करू शकतात.
2) मित्रांच्या नेटवर्कमध्ये विचारपूस.
- जे तुमचे कॉलेज किंवा शाळेचे माजी विद्यार्थी असतील त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्ही लहानपणापासून ज्या ज्या शाळेत शिकलात आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही पदवीचे शिक्षण घेतले आहे, त्या कॉलेजमध्ये बँकिंगमध्ये कोणी ना कोणी काम करत असणार त्यांना तुम्ही शोधा आणि त्यांच्यापर्यंत तुमचा जॉबचा रेफरन्स पोहोचवा.यासाठी तुम्ही सोशल मीडियाचीही मदत घेऊ शकता.
- तुमच्या प्राध्यापकांसोबत तुम्ही संपर्क करून शकता, त्यांना नक्कीच माहिती असेल की बँकिंग क्षेत्रात त्यांचे कोणते विद्यार्थी काम करत आहे. येथून संदर्भ मिळण्याची तुमची शक्यताही वाढू शकते.
3) ऑनलाइन वर्कशॉप्स आणि वेबिनारमध्ये भाग घ्या.
मित्रांनो आजच्या काळात खूप सारे ऑनलाईन इव्हेंट्स होतात ,फक्त बँकांच नाही तर एनबीएफसी कंपनी देखील अश्या इव्हेंट्स आयोजित करता असतात. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील इव्हेंट्स असतात, फायनान्शिअल इन्स्टिट्यूटसच्या इव्हेंट्स असतात त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकतात.
हे बँकिंग इव्हेंट्स ऑनलाईनसुद्धा असू शकतात आणि ऑफलाईनसुद्धा असतात. अश्या कार्यक्रमातील प्रोफेशनल लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व त्या कार्यक्रमातील स्पीकर सोबत देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे नेटवर्क वाढू शकतात.
या पद्धतीने रेफरन्स घेण्यासाठी, मी तुम्हाला रिकमेंड करतो की, इव्हेंट्स असताना स्मार्ट प्रश्न तुम्ही विचारा. जेणेकरुन तुम्ही तिथे सगळ्या लोकांमध्ये उठून दिसून येतानं आणि इव्हेंटनंतर तुम्ही तुमचे त्याठिकाणी बनलेले नेटवर्क टिकवून ठेवण्यास सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला अनेक रेफरन्स मिळू लागतील.
बँकिंग क्षेत्रातील इव्हेंट्स कशा शोधाव्या?
मित्रांनो, LinkedIn वर जा आणि तेथे LinkedIn इव्हेंट शोधा, त्याचप्रमाणे naukri.com, glassdoor वर देखील तुम्हाला अनेक events पाहायला मिळतील.
सोशल मीडिया इव्हेंटस
- तुम्हाला सोशल मीडियावर अनेक इव्हेंटस पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला ज्या बँका आणि NBFC कंपन्यांमध्ये काम करायचे आहे त्यांच्या सर्वात महत्वाच्या सोशल मीडिया पेजेसचला follow करा.
- रेडक्रॉस, लोइस क्लब अशा अनेक संस्था आहेत, हे लोकही अनेक कार्यक्रम आयोजित करत राहतात, त्यांची पेज फॉलो करा, तिथून तुम्हाला जॉबचे संदर्भ मिळू लागतील.
4) सर्टिफिकेशन
तुम्ही फायनान्सच्या कोणत्याही सर्टिफिकेशनमध्ये नावनोंदणी करा, फायनान्सशी संबंधित अनेक सर्टिफिकेशन आहेत, छोटे कोर्सेस आहेत, तुम्ही त्यात जॉईन व्हा.
- सर्टिफिकेशन कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला फायदा होईल. यातील अनेक कोर्सेस तुम्हाला नोकरीची हमीही देतात. तिथून तुम्ही रेफरन्स मिळू शकतात.
- तुम्ही सर्टिफिकेशन कोर्स करत असताना तिथे तुमचे बरेच मित्र बनतील त्यांच्याद्वारे सुद्धा तुम्हाला जॉब रेफरन्स मिळू शकतो.
- तुम्ही त्या संस्थेच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना संपर्क करू शकता जे कदाचित कुठेतरी बँकिंग क्षेत्रात काम करत असतील.
- बऱ्याच कोर्सेसमध्ये कम्युनिटी बनवलेली असते, त्या कम्युनिटीमध्ये बँकिंगमध्ये रुजू झालेले विद्यार्थी त्यांच्या कामाच्या ठिकाणी निघालेल्या भरती बदल माहिती देत असतात.
- तर तुम्हाला तेथूनही रेफरन्स मिळतात.त्यामुळे हे सर्टिफिकेशन केल्याने तुम्हाला रेफरन्स मिळवण्यात खूप मदत होऊ शकते.
5) सोशल मीडिया
- मित्रांनो, आपण नशीबवान आहोत की आपण सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत. जर आपण त्याला चांगल्या प्रकारे वापरत नसाल तर तो एक शाप बनू शकतो. प्रत्येक बँकेचे व्यावसायिक आणि SEOs देखील LinkedIn वर असतात. तुम्हाला तुमचे LinkedIn प्रोफाईल व्यवस्थित तयार करावे लागेल.
- तुम्ही LinkedIn वर टॉप प्रोफेशनलला संपर्क करू शकतात, त्यांच्याशी संबंध निर्माण करून आणि तिथून तुम्ही जॉबसाठी रेफरन्स घेऊ शकता.
- त्याचप्रमाणे, तुम्ही इन्स्टाग्रामवर रिच आउट करू शकता आणि त्याच प्रकारे तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर देखील प्रोफेशनलला संपर्क करू शकता.
- टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरील बँकिंग संबंधित गटांमध्ये सामील व्हा, संभाषणांमध्ये भाग घ्या आणि तुम्ही तेथूनही रेफरन्स तयार करू शकता.
6) इंटर्नशिप करा
मित्रांनो पूर्णवेळ नोकरी करण्यापेक्षा इंटर्नशिप घेणे खूप सोपे आहे. तुमच्या जवळच्या बँका किंवा NBFC तुम्हाला इंटर्नशिप देऊ शकतात.
दोन ते तीन महिने इंटर्नशिप करा, तिथे तुम्ही अनेक लोकांशी संपर्क साधाल, तुम्हाला अनेक लोक भेटतील आणि तुम्ही त्यांच्याकडून जॉब रेफरन्स घेऊ शकता.
7) तुमच्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांना संपर्क करा.
तुमच्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांपर्यंत पोहचा आणि त्यांना तुम्ही जॉबचा शोधात आहात आणि तुमचे काय क्वालिफिकेशन आहे हे सांगा.
तुमच्याकडे जास्त नेटवर्क नसेल पण तुमच्या गावातील प्रमुखाचे अनेक लोकांशी संबंध असतील, तुमच्या नगराध्यक्षाचे अनेक लोकांशी संबंध असतील तर ते तुम्हाला कुठेतरी जॉबसाठी संदर्भ मिळवून देऊ शकतात.
माझे सजेशन असेल की तुम्ही राजकारणी लोकांना कॉन्टॅक्ट करू नका, पण तुमच्या भागातील मोठे उद्योगपती असतील तर त्यांचे एकापेक्षा जास्त ठिकाणी बँक खाते नक्कीच असेल, ते तुम्हाला एक चांगला रेफरन्स देऊ शकतात.
तुम्ही या टेक्निकचा अवश्य वापर करा, जर तुम्ही कोणत्याही व्यावसायिकाशी संपर्क साधलात तर तो तुमच्यासाठी बँकेत फोन करून तुमचा रेफरन्स जरूर देईल.
8) स्वयंसेवा / Volunteering
- अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या ग्रामीण भागात आणि अगदी शहरी भागातही जनजागृती मोहीम चालवतात.
- हे लोक आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा जागरूकता संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात.
- त्याच वेळी, अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या स्वयं-सहायता गटांसोबत काम करतात आणि त्यांना निधी बँका, एनबीएफसी देतात.
- शेवटी मायक्रो फायनान्सिंगसाठी या स्वयंसेवी संस्थां खूप सारे कोलेब्रेशन करत असतात.
- त्यामुळे इथून सुद्धा, वॉलेटर करून तुम्हाला रेफरन्स मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.
Final Word :-
मित्रांनो, या आठ पद्धती तुम्हाला माहितीपूर्वक वाटल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि कोणती पद्धत तुम्ही वापरणार आहात ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकतात.
जर तुमच्याकडे पोस्टमध्ये दिल्या व्यतिरिक्त कोणत्या टिप्स असतील तर कृपया कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीच्या कम्युनिटीलाही कळेल आणि सर्वांना मदत होईल व ही पोस्ट तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा.